रामलिंग यात्रेनिमित्त शिरूर शहरातील वाहतुकीमध्ये बदल
शिरूर :सुदर्शन दरेकर
रामलिंग ता. शिरूर जि. पुणे येथे दिनांक २५/०२/२०२५ व दिनांक २६/०२/२०२५ रोजी सालाबादप्रमाणे प्रभु रामलिंग देवस्थानची महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त उदया दिनांक २५/०२/२०२५ रोजी शिवसेवा मंदिर येथुन पालखी मिरवणुक सुरू होणार असुन त्याकरीता मिरवणुक मार्गावरील वाहतुकी मध्ये अंशत बदल करण्यात आलेला असुन त्यामध्ये आहिल्यानगर येथुन येणारी वाहतुक बी जे कॉर्नर निर्माण पलाझा, सरकारी हॉस्पिटल मार्गे एस टी स्टैंड अशी जाईल. तसेच पुणे मार्गावरून येणारी वाहतुक ही एस टी स्टॅड, मार्केट यार्ड, सरकारी हॉस्पिटल, निर्मान प्लाझा अशी वळवण्यात आलेली आहे.
दिनांक २६/०२/२०२५ रोजी मौजे रामलिंग ता. शिरूर जि. पुणे येथे वाहतुकीमध्ये मलठन मार्ग शिरूर ला येणारी वाहतुक ही सरदवाडी मार्गे शिरूर ला येईल व शिरूर वरून जाणारी वाहतुक ही सरदवाडी मार्गे मलठन अशी वळवण्यात आलेली आहे.
शिरूर शहरामधील सर्व व्यापारी वर्ग यांना आवाहन करण्यात येते की पालखी मिरवणुक मार्गावरील आपले दुकाना समोर लागणारी वाहने लावु देवु नये तसेच लावलेली वाहने ही आपण काढुन घ्यावेत. जेणेकरून पालखी मिरवणुकीला कोणत्याही प्रकारे अडथळा निर्मान होणार नाही. याकरीता सर्वांनी सहकार्य करावे.
मौजे रामलिंग यात्रेनिमित्त वाहतुक कोंडी टाळण्याकरीता तीन मोठे पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे त्यामध्ये
शिरूर शहरामधुन जाणारे भाविक हे दसगुडे पार्कीन १ येथे वाहने पार्क करून एस टी बसने रामलिंग मंदिर दर्शनासाठी जातील.
टुव्हीलर, फोर व्हिलर वाहन व एस टी बस करीता बैलगाडा घाट येथे पार्कीग २ करण्यात आलेले आहे.
सरदवाडी व मलठन येथुन येणारे भाविकांकरीता रामलिंग मंदिरासमोरील ग्रांउड मध्ये पार्किंग सुविधा करण्यात आलेली आहे.
सदर रामलिंग यात्रेनिमित्त शिरूर पोलीस स्टेशन कडुन १० पोलीस अधिकारी व १०० पोलीस अंमलदार, २ पोलीस स्ट्रकींग, ५० स्वंयसेवक, १० होमगार्ड असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत प्रशासन व शिरूर पोलीस प्रशासन, शिरूर नगरपरिषद महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ शिरूर डेपो यांनी भाविकांच्या सेवेसाठी एसटी स्टँड ते रामलिंग मंदिर एसटीची सेवा भाविकांसाठी केलेली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे प्रसार माध्यमांशी बोलताना दिली .
